ॲग्रीबायोनिक्स: तरुण कृषी पदवीधर उद्योजक: यशोगाथा
अक्षय मासळकर
ऍग्रो बायोनिक प्रायव्हेट लिमिटेड
जातेगाव ता शिरूर जि पुणे
मी अक्षय मासाळकर कृषी महाविद्यालय पुणे येथून २०१८ साली बी एस्सी (कृषी) ही पदवी संपादन केली. पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आमचे बरेचशे कृषी मित्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देऊन विविध अधिकारी पदावर कार्यरत होण्यासाठी प्रयत्न करीत असतात. मात्र मी यापेक्षा वेगळा मार्ग निवडण्याचे ठरविले यासाठी मी कृषी क्षेत्रातील विविध उद्योजक आणि नोकरदार वर्ग यांच्याशी चर्चा केली.
मला कृषी संबंधित व्यवसाय करण्यासाठी बऱ्याच मित्रांनी सल्ला दिला सर्व चर्च अंतर्गत आणि पुणे शहरात मार्केटिंग होण्याच्या दृष्टीने कोणता व्यवसाय आपणास सुरू करता येईल याबाबत मी सर्व बाजूंनी विचार करून माझे मुळगाव आणि शेती शिरूर तालुक्यातील जातेगाव आणि हे गाव पुणे शहरापासून पन्नास किलोमीटर अंतरावर असल्याने या ठिकाणी मी ॲग्रीबायोनिक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्थापना करून त्या ठिकाणी २०१९ साली गांडूळ खत निर्मिती प्रकल्प सुरू केला. सुरुवातीस या व्यवसाय सुरु करण्यासाठी माझ्याकडे असणारे रुपये ७५ हजार इतकी गुंतवणूक केली. प्रकल्प सुरू होण्यापूर्वी करण्यापूर्वी मी गांडूळ खत निर्मितीसाठी लागणाऱ्या विविध बाबी आणि खत निर्मिती करत असताना येणाऱ्या अडचणी याबाबत सर्व माहिती घेतली. सुरुवातीस या व्यवसायासाठी लागणारे शेणखत आणि इतर काडीकचरा स्वतःच्या गाईंपासून आणि इतर शेतकऱ्यांपासून खरेदी केला सुरुवातीस फक्त दहा बेड गांडूळ खताचे तयार केले. बेड भरताना किंवा गांडूळ खत तयार होत असताना येणाऱ्या विविध अडचणींबाबत मी वेळोवेळी कृषी महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग आणि कृषी खात्यातील अधिकारी वर्ग यांचेकडून मार्गदर्शन घेत होतो.
पहिल्या टप्प्यात गांडूळ खत निर्माण झाल्यानंतर ते सूचनेनुसार स्वच्छ करून आणि चाळून घेतले. सुरुवातीच्या आलेल्या अनुभवानुसार कोणताही व्यवसाय सुरू करत असताना त्या व्यवसायाशी संबंधित उत्पादन करणे हे काम खूप सोपे असते मात्र तयार झालेला महाल बाजारात विक्री करणे आणि ग्राहकांच्या पसंतीस उतरले हे खूप अवघड असते याचाच विचार करून मी तयार झालेल्या गांडूळ खताचे पुणे शहरात विक्री होण्याच्या दृष्टीने तीन प्रकारचे विशिष्ट पद्धतीने पॅकिंग केले. पुणे शहरात बरेच लोक किचन गार्डनिंग साठी गांडूळ खताचा वापर करतात याबाबतची माहिती मी घेतली शहरात कोणकोणत्या भागात किचन काढणी जास्त प्रमाणात आहेत याचा विचार केला आणि त्या ठिकाणच्या लोकांना गांडूळ खताचे महत्त्व पटवून दिलं. गांडूळ खत वापरल्यास काय फायदे होतात हे त्यांना सुरुवातीस दाखवून दिले. त्यांना गांडूळखत वापरासाठी प्रबोधन करून यांचे मागणीनुसार मी १ किलो १० किलो आणि ५० किलो अशा तीन पिशव्यामधून गांडूळ खत भरले. पिशव्यावर गांडूळ खत कसे वापरावे खतांचे महत्त्व याबाबतची थोडक्यात माहिती देखील दिली. या तयार केलेल्या जागा व्यवस्थित पॅक करून पुणे शहरात विविध ठिकाणी स्वतः फिरून या गांडूळ खताचे विक्री केले.
अनुभवातून माणसाने नेहमी नवीन नवीन गोष्टी शिकत राहाव्यात असे मला वाटले कारणाने या पुणे शहरात इतर कोण कोणत्या गोष्टी गांडूळ खत विक्रीसाठी आपणास उपयुक्त पडतील याबाबत मी माहिती संकलित करण्यास सुरुवात केली त्यासाठी देखील मी विविध लोकांशी आणि व्यापारी वर्गाची देखील चर्चा केली तदनंतर आजचा बाजार परिस्थितीचा अभ्यास करून हे गांडूळ खत मी आम्ही अमेझॉन आणि इंडिया मार्ट या कंपन्यांचे कंपन्यांशी करार करून माझ्या गांडूळ खत विक्री ऑनलाईन सुरु केली. मला पुणे तसेच इतर शहरांमधून देखील गांडूळ खताची मागणी दोन-तीन वर्षांमध्ये यामध्ये मिळाले. आज रोजी मी माझ्या ॲग्रीबायोनिक्स प्रायव्हेट लिमिटेड जातेगाव शिरूर जिल्हा पुणे या कंपनीतून निर्मिती केलेले गांडूळ खत पुणे मुंबई यासारख्या शहरांबरोबरच पुणे तीस गावांमधून त्याची विक्री करीत आहे.
मला सांगण्यास आनंद वाटतो की आजमितीस जवळपास २ हजारांहून अधिक शेतकरी मी माझ्या ऍग्रो बियॉनिक कम्पनीतून तयार केलेल्या गांडूळ खताचा शेतीसाठी वापर करीत आहे. आज माझ्या कंपनीमध्ये सहा कर्मचारी पूर्णवेळ काम करीत असून माझ्या कंपनीची आर्थिक उलाढाल ४ वर्षात जवळपास ४८ लाखांपर्यंत पोहोचलेली आहे.